ताज्या बातम्या

सिमेंटच्या बाकड्याच्या वादातून थरार; कारच्या धडकेत पिता ठार, मुलगा गंभीर

जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील कुंभारी गावात सिमेंटच्या बाकड्याच्या वादातून गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कारने दुचाकीला धडक दिल्याचा आरोप असून, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५२ वर्षीय ज्ञानेश्वर उत्तम मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मुलगा यश मोरे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात सिमेंटचे बाकडे ठेवण्याच्या मुद्द्यावरून ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांचा मुलगा यांचा बाळू जोशी, शांताराम जोशी व अजय जोशी यांच्यासोबत वाद सुरू होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर पिता-पुत्र पहूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

दरम्यान, त्यांचा पाठलाग करून कारने दुचाकीला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धडकेत ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले, तर यश मोरे यांनाही दुखापत झाली. ज्ञानेश्वर मोरे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत बाळू उत्तम जोशी याला अटक केली आहे. या घटनेत इतर संशयितांची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे कुंभारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button