क्राइमजळगावताज्या बातम्या

पोलिसांची कामगिरी! १८ लाखांचे ९३ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले हस्तगत

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तू शोधण्यात एक मोठी यशोगाथा रचली आहे. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले व हरवलेले तब्बल १८ लाख रुपये किमतीचे ९३ मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

नागरिकांचे हरवलेले फोन शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करत पोलिसांनी केंद्र सरकारच्या CEIR (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने या फोनचा माग काढला. पोलीस कर्मचारी व तांत्रिक पथकाने रात्रंदिवस परिश्रम घेऊन राज्यभरात व वेगवेगळ्या भागात ट्रेस झालेल्या या मोबाईल फोनचा शोध घेतला.

आजच्या डिजिटल युगात मोबाईलमध्ये नागरिकांचा महत्त्वाचा वैयक्तिक डेटा, बँक तपशील आणि आठवणी असतात. त्यामुळे फोन गहाळ झाल्यास नागरिकांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसतो. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कठोर प्रयत्नांमुळे आपले हरवलेले फोन पुन्हा हातात मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत असल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button