क्राइमजळगावताज्या बातम्या

अमळनेरमध्ये तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; लग्नासाठी दबाव आणत जीवे मारण्याची धमकी

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा हात पकडला आणि लग्नासाठी बळजबरी करत विनयभंग केल्याची संतापजनक घटना अमळनेर शहरात घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी अमळनेर शहरात शिक्षण घेत असून १३ ऑक्टोबर रोजी ती नेहमीप्रमाणे शहरात आली होती. तिचा टायपिंग क्लास संपल्यानंतर ती एका मंदिराजवळ उभी होती. यादरम्यान, सूरज नंदलाल पाटील (रा. अमळनेर) हा संशयित आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आला. त्याने तरुणीजवळ येऊन तिच्याशी लग्न करण्याची मागणी केली. तसेच तिचा उजवा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला.

या प्रकारामुळे घाबरलेल्या मात्र धाडसी तरुणीने आरोपीला सज्जड दम देत, “तू माझा हात ताबडतोब सोडला नाही, तर मी आरडाओरड करेन,” अशी तंबी दिली. तरुणीचा हा इशारा ऐकून आरोपी सूरज पाटील हा आपली दुचाकी घेऊन तिथून पसार झाला.

घडलेला हा संपूर्ण प्रकार पीडित तरुणीने घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांसह अमळनेर पोलीस ठाण्यात गाठून पीडितेने या प्रकरणाची सविस्तर फिर्याद दिली. पोलिसांनी फिर्यादीनुसार संशयित आरोपी सूरज नंदलाल पाटील याच्या विरोधात विनयभंग, पाठलाग करणे, बळजबरी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button