क्राइमजळगावताज्या बातम्या

ब्रेकिंग: शेतजमिनीच्या मोजणीसाठी लाच मागणाऱ्या शिपाईसह एकाला अटक

भुसावळ प्रतिनिधी | शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणात तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणात भुसावळ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाईसह एकाला अटक करण्यात आली असून दोघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदार हे ३६ वर्षीय असून ते खासगी नोकरी करतात. त्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला होता. या प्रकरणात शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन किसन पाटील, वय ४५ वर्षे, तसेच खाजगी पेंटर राकेश रामदास चव्हाण, वय ४३ वर्षे अशी आरोपींची नावे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.

तक्रारीची पडताळणी १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कारवाई केली. या प्रकरणात लोकसेवक सचिव पाटील यांच्याशी संबंधित आरोपांचाही उल्लेख आहे.

या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सुरू आहे. लाचलुचपक पथकाने केलेल्या कारवाईमुळे भूमि अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button